पुणे शहराची महापालिका हद्द २७ एप्रिलपर्यंत सील – आयुक्त शेखर गायकवाड

पुणे : पुणे शहरात कोरोना आणखी पसरण्याची चिन्हे आहेत. याची दक्षता म्हणून संपूर्ण महापालिका हद्द येत्या २७ एप्रिलपर्यंत ‘सील’ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने रविवारी घेतला आहे. हा निर्णय रविवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात ये-जा करता येणार नाही. त्याचवेळी सूंपर्ण शहरातील जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीची दुकाने केवळ दोन तास सुरू राहतील. अशी माहिती “न्युज अनकट” शी बोलताना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

याशिवाय अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या घटकांना मात्र या निर्णयातून सवलत आहे. नव्या निर्णयानुसार शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील भाग ‘सील’ करून त्याबाबतची कार्यवाही पोलिसांमार्फत होणार आहे. त्यानुसार तयारी करण्याबाबत सूचना पोलिसांशी चर्चा करण्यात आली असल्याची माहितीही आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत असून, ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्या भागात संख्या होती तो भाग सीलाही करण्यात आला होता मात्र, तरीही, बहुतांशी भागांत रुग्ण वाढल्याने शेवटी महापालिकेची संपूर्ण हद्दच सील करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.

त्यामुळे येत्या २७ एप्रिलपर्यंत महापालिकेच्या हद्दीतील सर्व प्रमुख रस्ते, गल्लीबोळ पूर्णपणे बॅरिकेडच्या माध्यमातून बंद केले जाणार आहे. तसेच, नागरिकांना रोज सकाळी दहा ते बारा या वेळेत जीवनाश्यक वस्तुंची खरेदी करता येणार आहे.

यावेळी आयुक्त गायकवाड यांनी सांगितले की, “वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाय करूनही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळे संपूर्ण शहर सील करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी असेल. परंतु, नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.असेही त्यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा