नीरा : कोरोना कोव्हिड१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर गदा आली आहे. कामगारांना रोजगार नसल्याने उपासमारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोरगरीबांना दोन वेळच्या जेवणाची गरज भासू लागली आहे. ही गरज ओळखून पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी नीरा (ता.पुरंदर) येथे आजपासून (रविवार) “आनंदी थाळी” उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे नीरा शहरातील बाराशे कुटुंबाची भुक भागली आहे.
नीरेतील ६ हा ही प्रभागातील सार्वजनिक ठिकाणी या थाळीचे वितरण करण्यात येत आहे. भोर पुरंदरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नासाहेब जाधव यांचे हस्ते आनंदी थाळीचे वितरण करण्यात आले. नीरा शहरातील सह प्रभागातील प्रत्येकी दोनशे कुटुंबाला आनंदी थाळीचे वितरण करण्यात आले.
यावेळी स्वयंपाक करण्यासाठी राधाकृष्ण मंगल कार्यालयाचे अॅड.उत्तम अडवणे यांनी कार्यालय उपलब्ध करून दिले. प्रसिद्ध कॅट्रस अजित माने यांनी न नफा न तोटा या तत्वावर स्वयंपाक तयार करण्यासाठी मेहनत घेतली. नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, माजी जी.प.सदस्य विराज काकडे, अॅड. विजय भालेराव, चंदरराव धायगुडे, कल्याण जेधे, संदेश गायकवाड, नंदु शिदे, जावेद शेख यांसह काँग्रेस पार्टीचे यवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी – राहुल शिंदे