मुरादाबाद दगडफेक घटनेतील ७३ पोलिस क्वारंटाईनमध्ये

33

मुरादाबाद: लॉकडाऊन च्या काळात बहुतेक लोक आपल्या घरात असताना पोलिस रात्रंदिवस आपल्या कामात व्यस्त असतात. या काळात त्यापैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे तर काहींना संसर्ग होण्याचा धोका आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. १५ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह मृतांच्या नातेवाईकांचे विलगीकरण करण्यासाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पोलिसांच्या पथकावर अचानक हल्ला झाला आणि दगडफेक केली गेली. या हल्ल्यातील १७ आरोपींना अनेक महिलांसह पोलिस ठाण्यात आणण्यात आले. कारवाईनंतर त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले परंतु त्यातील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले त्यामुळे या प्रकरणातील सुमारे ७३ पोलिसांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये क्वारंटाईन केले गेले आहे
मुरादाबादचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक अमित पाठक यांच्या म्हणण्यानुसार, सर्व ७३ पोलिस कर्मचार्यांठना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन केले असले तरीही नागफनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे कर्मचारी आहेत.