श्रीगोंदा, दि. १४ जून २०२०: चारिञ्याच्या संशयावरून पत्नीला विहिरी बुडून ठार मारण्याची घटणा कर्जत तालुक्यातील चाखले वाडी येथे घडली आहे. शुक्रवार दि १२ दुपार नंतर पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या विषयी कर्जत पोलिस ठाणे पतिविरूध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पत्नी आरती खटके वय ३५ हिचा खुन केल्या प्रकरणी पति सुरेश सिध्दु खटके राहाणार चाखले वाडी याच्या विरोधात मयताचे वडिल बलभीम शंकर मिंड रा.जलालपूर यांनी फिर्याद दिली आहे. कलम ३०२ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने पोलिस काॅन्स्टेबल अमित बरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पतिला पोलिसांनी अटक केली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड आणि सुरेश माने करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष