गोल पोस्ट राष्ट्रीय कुपवाड येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन टारझनचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात

कुपवाड येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन टारझनचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात

कुपवाड, सांगली २४ जुलै २०२३ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन टारझन हा आज पहाटे पुण्याहून आहिल्यानगर मधील एका महिलेच्या घरात आला होता. ही माहिती मिळताच संशयित तरुणाने घरात घुसून टारझन यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वर्मी घाव घातले. यावेळी सचिन टारझन हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येताच संशयित हल्लेखोर तेथून पसार झाला.

जखमी टारझन याला काही नागरिकांनी जखमी अवस्थेत सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने संशयितास ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version