नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच; पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत आढळला युवकाचा मृतदेह

6

पुणे, २१ जानेवारी २०२३ : नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून, आज शनिवारी (ता.२१) पुन्हा पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतील पेठ रोड, पाटालगत असलेल्या समर्थनगर भागतील मैदानात एका ३० ते ३५ वयोगटातील युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

कोणीतरी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर दगडाचा जबर मार असून त्याची ओळखही अद्याप पटलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ओळख पटविण्यासाठी स्थानिक नागरिकांनाही पाचारण करण्यात आले होते; मात्र चेहऱ्यावर खूप जखमा असल्यामुळे कोणीही ओळख पटवून दिलेली नाही. पोलिसांसमोर या खुनाच्या गुन्ह्याची उकल करणे आता मोठे आव्हान राहणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा