पुणे : पुण्याचे नवे महापौर म्हणून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. फक्त औपचारिकता बाकी असल्याचे चित्र पहायला मिळाले. तर, उपमहापौरपदही भाजपकडे राहणार आहे. या पदाची माळ भाजपने नगरसेविका सरस्वती शेंडगे यांच्या गळ्यात पडली आहे.
महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित आहे. या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याची पाहायला मिळाली. राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अभ्यासू आणि अनुभवी नगसेवकाला या पदावर संधी मिळेल, असे. पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले होते.त्यानुसार मोहोळ यांना ही संधी दिली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली.
या पदासाठी येत्या २२ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज (सोमवारी) अर्ज भरण्यात येणार आहेत. महापालिकेत भाजपकडे ९९ नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदासह सर्व पदाधिकारी भाजपचेच आहेत. आता उपमहापौरपदही भाजपकडेच राहिले आहे.