मुर्टा – मानमोडी गावाला आदर्श गाव बनवणार – खासदार ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद, ८ ऑगस्ट २०२० : संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत मी दत्तक घेतलेल्या तुळजापूर तालुक्यातील मुर्टा- मानमोडी या गावाला आदर्श गाव बनवणार असे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे. तसेच, दिनांक ७ ऑगस्ट रोजी गावातील समस्यांसंदर्भात आढावा बैठक या गावात त्यांनी घेतली.

या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गावातील नागरिकांशी त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. तसेच, पायाभूत सुविधा देण्याबरोबरच आदर्श गाव बनवण्यासाठी गावातील प्रामुख्याने समस्या, मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, गावांतर्गत सिमेंट रस्ते, सुशोभीकरण शेत रस्ते, गावजोड रस्ते, पाणंद रस्ते, फळबाग लागवड करणे, दारू बंदी, गावात आरोग्य शिबीर राबवणे, महिलांसाठी लघुउद्योग, तांडा वस्ती वर पाणी पुरवठा करणे, सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते करणे, अंगणवाडी बांधणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी LED लँप बसवणे, सोलार पंप बसवले, सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीचे बांधकाम करणे, नविन ग्राम सचिवालय बांधणे, सिंगल फेस डी पी बसवणे, शाळेत व सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात यावेत, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, अशा विविध विषयांवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. सोबतच, घरकुल योजनेचा देखील आढावा घेतला.

या आढावा बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, भाजपा तालुका प्रमुख सत्यवान (भाऊ) सुरवसे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. राऊत, जि. प. कार्यकारी अभियंता सुनिता पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, कृषी अधिकारी श्री. गायकवाड, जि. प. सदस्य, सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, तलाठी, ग्रामसेवक,तसेच सर्व विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते,

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा