कोलकाता, २२ फेब्रुवरी २०२१: कोलकाता पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पामेला गोस्वामी यांना त्यांच्या दोन साथीदारांसह रंगेहाथ पकडले. पामेला कडून पोलिसांनी कोकेन जप्त केले आहे. पामेला आणि तिचे साथीदार बराच काळ ड्रग्सच्या तस्करीत गुंतले होते, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
आता तपासात हे उघड झाले आहे की, पामेलाच्या वडिलांनाही मुलगी ड्रग्समध्ये अडकली असल्याची जाणीव होती. या संदर्भात पामेलाच्या वडिलांनी कोलकाता पोलिसांना पत्र लिहून माहिती दिली. पामेलाच्या वडिलांनी ८ एप्रिल २०२० रोजी पोलिस मुख्यालय लाल बाजारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीलबंद कव्हरमध्ये हे तक्रार पत्र दिले.
‘मुलीला मादक पदार्थांची सवय आहे’
या चिठ्ठीत अटक केलेल्या भाजपा नेती पामेलाच्या वडिलांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आपली मुलगी पामेला मादक पदार्थांची व्यसनाधीन झाली आहे आणि तिचा मित्र प्रवीर कुमार डे याने आपल्या मुलीला ड्रग्स दिली आहेत असे त्यांना वाटते.
या पत्राची एक प्रत कोलकाता पोलिस आयुक्त आणि जॉइंट सीपी (गुन्हे) यांना पाठविली गेली.
प्रबीर कुमार डे नावाच्या माणसावर आरोप
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वामी विवेकानंद रोड येथे राहणारे कौशिक गोस्वामी यांनी गेल्या वर्षी ८ एप्रिल रोजी लिहिलेल्या आपल्या पत्रात ४२ वर्षीय प्रबीर कुमार डे नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीशी मैत्री केल्याचा आरोप केला आहे. या व्यक्तीचे आधीच लग्न झाले आहे आणि ८ वर्षाच्या मुलीचा पिता देखील आहे.
कोलकाता पोलिसांनी पत्राचा हवाला केला आहे की, दोघांनी संयुक्तपणे एक इंटिरियर डिझायनर कंपनी उघडली. पत्रानुसार प्रबीर कुमार याने कौशिक गोस्वामीच्या मुलीला ड्रग्सचे व्यसन लावले. तो तिला दररोज ड्रग्स देत असे.
कौशिक गोस्वामी म्हणतात की, जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला व प्रबीरला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे ऐकले नाही. प्रमेर डे याने लग्न करूनही आपल्या मुलीशी लग्न करण्याचे वचन दिले होते असा आरोप पामेलाच्या वडिलांनी केला आहे. कौशिक गोस्वामी यांनी प्रबीर याला याबाबत विचारले असता या व्यक्तीने सांगितले की, आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी तीन महिन्यांची गरज आहे. परंतु हा काळ गेला तरी त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

