मेरी अम्मा तो मर गई, मतिमंद मुलाची हाक दोन दिवसांनंतर समजली

सोलापूर, दि.१० मे २०२०: सोलापूर येथील शास्त्री नगर येथे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांचा घरातच मृत्यू झाला. “मेरी अम्मा तो मर गई” अशी त्या मतिमंद मुलाची हाक..ज्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. मात्र दोन दिवसानंतर नातेवाईकांनी घरात जाऊन पाहिले तर त्या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता.

लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरी काळजी घेण्यासाठी जाता न आल्याने त्यातच वाढलेल्या उन्हामुळे वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यू झाला. असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

हसीना शिलेदार वय ६० व त्यांचे पती अब्दुल गनी शिलेदार वय ६५ अशी मृत दाम्पत्यांची नावे आहेत. त्यांना एक मुलगाही असून तो मतीमंद आहे. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्यांची काळजी हे त्यांचे नातेवाईकच घेत होते. रोज त्यांना डबा देणे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे, आंघोळ घालणे ही कामे त्यांचे नातेवाईकच करत होते.

लष्कर परिसरात लॉकडाऊन असल्यामुळे डबा द्यायला जाणे व त्यांची काळजी घेणे अवघड झाले होते. अब्दुल गनी शिलेदार हे महापालिकेतून सेवानिवृत्त झाले होते. गुरुवारी अशपाक शिलेदार व त्यांचे इतर नातेवाईक घरी गेल्यानंतर दोघे दाम्पत्य मृत झाल्याचे दिसून आले.
शासकिय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊनमुळे जेवन द्यायला जाण्यात अडचणी आल्या होत्या. आम्हाला तिथे जाता येणे शक्य नव्हते. तीन दिवस आम्हाला त्यांना जेवण देता आले नाही.

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मावशीची तब्येतही बरी नव्हती. तर काकांना त्यांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. ही बाब आम्हाला दोन दिवसानंतर समजली. ..मेरी अम्मा तो मर गई या वाक्याने पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा