दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज, कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले आहे. अशी कथा प्रचलित आहे.
भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. हेच कारण आहे की, या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते
या दिवशी भावाला तेल-उटणे लावून आंघोळ घालावी.
बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे.
भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे.
भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.