नफरत छोडो -भारत जोडो

नांदेड, ९ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्राच्या भूमीत राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर ला महाराष्ट्रात दाखल झाली असून आज महाराष्ट्रात यात्रेचा तिसरा दिवस आहे. राहूल गांधींच्या जिद्दीचा हा प्रवास अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत सुरु आहे. देशाच्या राजकारणात २०१४ पासून सुरु झालेल्या नरेंद्र मोदी लाटेतही मराठवाड्यातील आपला काँग्रेसचा गड राखून ठेवण्यात यश प्राप्त करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात यात्रेचे तेलंगणा मार्गे आगमन झाले आहे, दरम्यान राहुल गांधी यांनी सभेमध्ये भाजप आणि संघावर हल्लाबोल केला आहे.

देशात कटुता निर्माण करण्याचे काम भाजप व संघाकडून केले जात आहे.जाती-धर्मामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. आपल्याच देशातील जाती-धर्माच्या लोकांमध्ये वाद निर्माण करणारे भारतीय जनता पक्षाचे कोणत्या देशाचे देशभक्त आहेत, असा सवाल केला आहे, तसेच हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, असे विधान करत राहुल गांधी यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

तसेच भारत जोडो यात्रेबद्दल शहरी भागांसह ग्रामीण भागात खुप मोठा प्रतिसाद मिळत आहे, देशातील निर्माण झालेली बेरोजगारी, वाढलेली महागाई, यासारख्या प्रत्येक प्रश्नावर केंद्रातील एनडीए सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे, तसेच या यात्रेची सगळी माहिती प्रसार माध्यमांतूनच नाही तर सोशल मीडिया मार्फत घरोघरी पोहचवली जात आहे. तसेच दुभंगलेल्या नागरिकांना एकत्र जोडण्यासाठी ही यात्रा जोडणारी ठरणार आहे, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा