नगर जिल्ह्यातील ७५ गावातील पाणी पिण्यासाठी अयोग्य

नगर : जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात ७५ गावांतील सुमारे १५६ नमुने दूषित आढळून आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण यांच्यातर्फे गत महिन्यात पाण्याचे नमुने तपासले. त्यात १५६ नमुने दूषित असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
दर महिन्याला जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले जातात. यंदा मागील महिनाअखेरपर्यंत १७ हजार १९८ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासले. त्यातील ९६७ ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित आढळले.

दूषित पाणी असलेली गावे
● अकोले: देवठाण, डोंगरगाव, मुथाळणे, ब्राह्मणवाडा, जांभळे, गारवाडी, पिंपळदरी, जांभळदारी, वेलदरा.
● नगर : हमीदपूर, गुणवडी, चास, मेहकरी.
● पारनेर : धोत्रे बुद्रुक, जामगाव, ढवळपुरी, हंगे, निघोज, कोहकडी, हकिगतपूर, अळकुटी, कान्हूर पठार.
● संगमनेर : कुंभारवाडी, वरवंडी, धांदरफळ बुद्रुक, डेरेवाडी, वेल्हाळे, निमगाव भोजापूर.
● शेवगाव : मळेगाव, दहिफळ जुने, दहिफळ नवे, भातकुडगाव, लाखेफळ.
● पाथर्डी : कोरडगाव, धामणगाव, जिरेवाडी, जाटदेवळे.
● राहुरी : देवळाली प्रवरा, वळण, चांदेगाव, लाख, दवणगाव, पाटी, जलपा त्रिंबकपूर, चिंचविहीर, कणगर, बोधे खुर्द.
● जामखेड : नान्नज.
● श्रीगोंदे : कोळगाव, निंबवी, सारोळे सोमवंशी, कोरेगव्हाण, जंगलेवाडी, म्हातारपिंप्री, हिरडगाव, चिखलठाणवाडी, घोडेगाव, वेळू, कासेगव्हाण, शेडगाव, मुंगूसगाव, भानगाव, घुटेवाडी.
● कोपरगाव : सोयेगाव, गोधेगाव, संवत्सर.
● कर्जत : कुळधरण, बारडगाव सुद्रिक.
● राहाता : दहेगाव कोऱ्हाळे, साकुरी, एकरुखे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा