नगर शहर परिसरात धुकेच धुके…

अहमदनगर : थंड हवेच्या ठिकाणी पाहावे तिकडे धुक्याची चादर पसरलेली आणि हवेत कमालीचा गारवा, असे दृश्य सर्रास दिसते. अगदी असाच कडक थंडीचा अनुभव आज सकाळपासून नगरकर घेत आहेत.

नगर शहर परिसरात पहाटेपासूनच दूरवर धुके दिसत होते. हळुहळू धुक्याची लाट नगर शहर व परिसरात पसरत गेली आणि सर्वत्र धुकेच धुके दिसू लागले. सकाळी उशिरापर्यंत धुक्याची ही चादर ओसरली नाही. शनिवारी बहुतांश शाळा सकाळी भरत असल्याने स्कूल बस, रिक्षा यांसह स्वतः मुलांना शाळेत सोडवणारे पालक यांची धांदल उडाली.

रस्ता दिसत नाही, रहदारीचा अंदाज येईना, अशा स्थितीत वाहनांचे दिवे चालू ठेवून, प्रसंगी अधून-मधून हॉर्न वाजवत अनेकांनी मार्ग काढला.
चारचाकी वाहन चालकांनी गाडीची साईट लाईट्स चालू ठेवून सावध पवित्रा घेतला. अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अधिक काळ राहिलेली अशी ‘धुके’दायक परिस्थिती नगरमध्ये पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे बोलले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा