नगर शहरात दोन तलवारधारी अटकेत; शहर पोलीसांची कारवाई

अहमदनगर : हल्ला करण्याच्या उद्देशाने शहरामध्ये विना परवाना तलवार घेऊन फिरणार्‍या दोघांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० हजार रूपये किंमतीच्या दोन तलवारी जप्त केला आहे. ही कारवाई शहर पोलीसांनी सोमवारी (दि. १३) रात्री लालटाकी परिसरात केली.
मोहन संजय रोकडे (वय- २७ रा. लालटाकी) व अमित कैलास चव्हाण (वय- ३५ रा. भिंगार) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
हल्ला करण्याच्या उद्देशाने जवळ तलवारी असलेले दोन अनोळखी इसम लालटाकी परिसरात असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपाधीक्षक मिटके यांनी पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सोबत दोन पंचासमक्ष नऊच्या सुमारास लालटाकी परिसरातील एका मेडीकल समोर छाप घालून मोहन रोकडे याला अटक केली.
आठशे रूपये किंमतीची एक तलवार जप्त केली आहे. त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दुसरी करवाई साडेदहाच्या सुमारास लालटाकी परिसरातील एका फर्निचर दुकानासमोर उभा असलेल्या दुचाकीवरील इसमावर छापा घालून केली. तेथे अमित चव्हाण याला अटक केली. त्याच्याकडून २९ हजार २०० रूपये किंमतीची एक तलवार जप्त केली आहे. त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस हवालदार सुयोग सुपेकर, महेश मगर, बाबासाहेब फसले, सागर द्वारके, गणेश चव्हाण, बाळासाहेब मासाळकर, राजेंद्र जायभाय, गोरख घोलप यांच्या पथकाने केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा