नगर शहरात पोलिसांची संपादकांना मारहाण

अहमदनगर : शहरातील प्रोफेसर चौकात रस्त्यामध्ये एका वकिलाने त्यांचे चारचाकी वाहन रस्त्यात लावले. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले. ही घटना दैनिक आनंद या पेपरचे संपादक विठ्ठल शिंदे यांनी याबाबत वाहतूक पोलिसांना विचारणा केली, परंतु त्या पोलिसांनी त्यांना सरळ मारायला सुरुवात केली.कुठलीही शहानिशा न करता त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथेही त्यांना मारहाण करण्यात आली. यावरून नगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन किती मुजोरपणा करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.ही घटना पत्रकारांना समजल्यानंतर सगळे पत्रकार पोलीस स्टेशनला दाखल झाले. व मारहाण केल्याचे कारण विचारू लागले. परंतु पोलिसांनी काहीही उत्तर दिले नाही.
या घटनेची फिर्याद दाखल करुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे नगर शहरातील सर्व पत्रकारांनी पहाटे ३ पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर नगर शहराचे पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी मध्यस्थी करून हे मिटवले. पोलिस कर्मचाऱ्यांना प त्रकार शिंदे याची माफी मागण्यास सांगितली.
या आंदोलनावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, मन्सुर शेख, मनोज मोतयानी, दिपक मेढे, अशोक झोटींग, भोपै अरुण नवथर, गणेश शेंडगे, प्रकाश साळवे, सुनिल थोरात आदी सहभागी झाले होते. ज्या पोलिसांनी मारहाण केली त्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडियावर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा