अहमदनगर : राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनने, एसटी सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध मागण्या व प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी अहमदनगर एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
या मागण्यांचे निवेदन वाहतूक पर्यवेक्षक नितीन गटणे व सहा.वाहतूक अधीक्षक चंद्रकांत खेमणार यांना देण्यात आले.
एसटी पाससाठी विधवा महिलांची वयाची अट ७५ वरुन ६५ न करता पूर्वीप्रमाणे ठेवावी, विधवांनाही ६ महिन्याच्या पासेसची सुविधा मिळावी, सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शन व अनपेड रक्कम संदर्भात माहिती मिळावी, करार फरक मिळावा, बसची संख्या कमी असल्याने पासधारक कर्मचार्यांना सर्वच गाड्यांमधून प्रवास करण्याची सवलत द्यावी, पासची मुदत जानेवारी ते डिसेंबर अशी ठेऊन दोन दोन महिन्यांचे तीन पास द्यावेत, चालकांचे वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असतानाही स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज घेऊन त्यांना कुठलेही लाभ दिले जात नसून, त्यांना तातडीने लाभ द्यावे, उपदान ग्रॅच्युइटीची रक्कम त्वरित मिळावी.
या आंदोलनात संघटनेचे सचिव गोरख बेळगे, अध्यक्ष बलभीम कुबडे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार खुशालसिंग परदेशी, कॉ.आनंदराव वायकर, उत्तम रणसिंग, विठ्ठल देवकर, कैलास ढुमणे, सावंत, मोकाटे, डहाळे, रोहोकले, मोहित बागडे, दहिफळे, गाजरे, पठारे, यादव, ताकटे, गाडे, कर्डिले, केळकर सहभागी झाले होते.