नागपूर: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘सावरकर’ विधानावरून खळबळ उडाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात भाग घेण्यासाठी नागपुरात दाखल झालेल्या भाजपच्या आमदारांनी ‘मैं भी सावरकर’ टोपी घातली आहे. वास्तविक राहुल गांधींनी दिल्लीच्या मेळाव्यात सांगितले होते की मी राहुल सावरकर नाही, जे माफी मागेल. राहुल यांच्या या वक्तव्यामुळे भाजप तसेच शिवसेनेलाही हे योग्य वाटले नाही.
टोपी घालून राहुल गांधींच्या विरोधात घोषणाही देण्यात येत आहेत.त्यांनी माफी मागावी अशी मागणी नेत्यांनी लाऊन धरली आहे. यावरून निदर्शने करण्यात आली. फडणवीसांनी ही या बाबत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. त्याच बरोबर चंद्रकांत पाटलांनी ही आपली प्रतिक्रिया नोंदवली.