नागपूर १९ मार्च २०२४ : गोपनीय माहीतीच्या आधारे उत्कृष्ट कामगीरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नागपूर पोलीस आयुक्तांकडून सत्कार करण्यात आलाय. मा.पोलीस आयुक्त श्री. रविंद्र सिंगल नागपूर शहर यांनी १८ मार्च रोजी ४ वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन येथे गुन्हे शाखा यूनिट ४ चे अधिकारी आणि अंमलदार यांना बोलावून त्यांच्या कामगिरीबद्दल सत्कार केला.
दिनांक १७ मार्च रोजी क्राईम युनिट क्र.४ चे अधिकारी व अंमलदार यांना रात्री १ च्या दरम्यान गोपनीय माहिती प्राप्त झाली की, मेथीडेक चर्च समोर, मेकोसाबाग पुलीया लगत, जरीपटका, नागपूर येथे काही संशयित इसम हे देशी बनावट पिस्टल (अग्नी शस्त्र) व जीवंत काडतूसांची तस्करी विक्री करीत आहे. मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहिती वरून सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून देशी बनावट पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ताब्यात घेतलेले आरोपी सिकंदर उर्फ शेखू सफुदिन खान वय ३८ रा.मेकोसाबाग पो.स्टे जरीपटका नागपूर, अंकित सुनील वाल्मीक वय.२३ वर्ष रा. बेंझनबाग पो.स्टे जरीपटका नागपूर, सन्नी गणेश तोमस्कर वय.२२ वर्ष रा.बोरकर नगर, बारासिंगल पो.स्टे इमामवाडा नागपूर, आदित्य हेमराज पडोळे वय.२० वर्ष रा.कामना नगर पो.स्टे कळमना नागपूर हे असून त्यांच्याकडून ४ देशी बनावट पिस्टल (अग्नी शस्त्र)किंमत दोन लाख रुपये ९ जीवंत काडतूस किंमत नऊ हजार , एक चारचाकी वाहन किंमत दहा लाख रुपये, एक दुचाकी वाहन किंमत सत्तर हजार रुपये, मोबाईल फोन किंमत साठ हजार रुपये असा एकूण १३,३९,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
या कार्याची पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी स्वतः जातीने दखल घेऊन त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत तसेच त्यांच्या या कार्यामुळे जनमानसात पोलिसांची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याने क्राईम युनिट क्रमांक ४ चे पो. नि श्री रमेश ताले (युनिट इन्चार्ज), पो. उपनि अविनाश जायभाये, पो हवा. सुनील ठवकर, पो हवा रोशन तिवारी (माहिती घेणारे) पो हवा.अतूल चाटे, पो.हवा.आशिष क्षिरसागर, नापोअं चेतन पाटील, नापोअं देवेंद्र नवघरे, पोअं संदीप मावलकर, पोअं. सत्येंद्र यादव, पो हवा नरेंद्र बांते, पोअं श्रीकांत मारवाडे यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलावून त्यांची प्रशंसा करून त्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन संपूर्ण टीमचे कौतुक व अभिनंदन केले.
न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे