नागपूर शहरात बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांची धडक कारवाई, एका दिवसांत २२० रिक्षा केल्या जप्त

नागपूर, १९ ऑगस्ट २०२३ : जुलै महिन्यात राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. याचा परिणाम शहरातील रस्ते वाहतुकीवर झालेला दिसून येतो. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास येते. तर काही शहरात वाहन चालकांकडून आरटीओच्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही वाहतूक कोंडी होत असते. याचा भार पोलीस यंत्रणेवर पडतो. तर काही शहरात वाहतुकीचे वाहतुकीचे नियम न पाळल्यानेही वाहतूकीचा बोजवारा उडतो. आता नागपूर शहर पोलिसांनी वाहनांवर कारवाईची मोहीम घेतली आहे.

नागपूर शहरात रिक्षा चालकांवर आता चाप बसणार आहे. कारण नागपुर शहरातील बेशिस्त ऑटोरिक्षाचालकांवर पोलिसांची नजर आहे. नागपूर मधील बेशिस्त ॲाटोचालकांवर कारवाईची मोहिम नागपूर पोलिसांनी सुरु केली आहे. या मोहिमेतून शहरात एका दिवसात तब्बल २२० पेक्षा जास्त ॲाटोरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

ॲाटो रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसवणे, सिग्नल तोडणे, रॅश ड्रायव्हिंग आणि प्रवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या ॲाटोचालकांवर नागपूर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर शहरात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिम राबवत ही कारवाई केली आहे. जप्त केलेले २२० ऑटोरिक्षा थेट पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात जमा केल्याचे पाहायला मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा