नागपूर रेल्वेस्थानकावर दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर: नागपुर मध्ये एका दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पळून जाऊन लग्न केलेल्या या दाम्पत्यांनी आपल्यावर ओढवलेल्या आर्थिक नैराश्यामुळे हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी रात्री युवक व त्याची पत्ती ज्ञानदेवी हे दोघे नागपूर रेल्वे स्टेशनवर दाखल दाखल झाले होते आणि त्यानंतर अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उभ्या असलेल्या रेल्वे गाडीवर ते दोघे चढले. दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा त्यांचा मृत्यू होईल हे लक्षात आल्यावर प्रवाशांना आरडाओरडा सुरू केला. ही घटना समजताच रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने इलेक्ट्रिक करंट बंद केला. अधिकाऱ्यांनी हाय व्होल्टेज तारांचा करंट बंद करण्याआधीच युवकाने तारेला स्पर्श केला होता. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या पत्नीस वाचवण्यात रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना यश आले आहे. दरम्यान चा प्रकार एका मोबाईल कॅमेरा मध्ये कैद करण्यात आला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा