पावसाचा कहर नागपूर जलमय; मंदिर कोसळले

नागपूर, १० ऑगस्ट २०२२: नागपूर जिल्ह्यासह पूर्ण शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसाचा जोर वाढल्याने शहरातले शिव मंदिर कोसळले असून सहाजन गंभीर जखमी झाले आहेत. त्यात एका लहान मुलीचाही समावेश आहे‌. जखमींना उपचारासाठी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.

अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. मौदा तालुक्यातील झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच आज होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

गोरेवाडा तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जवळच्या कुही तालुकाही जलमय झाला असून शेतात पाणी साचले आहे. नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे व सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा