नागपूरचा ‘चड्डीवाला’ तमिळनाडूचे भविष्य ठरवू शकत नाही: राहुल गांधी

नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२१: विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेत राजकीय हालचालींना वेग आला आहे.  पोंगल उत्सवानंतर राहुल गांधी पुन्हा तामिळनाडूला पोहोचले आहेत.  तामिळनाडूमधील आपल्या दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र आणि संघावर जोरदार टीका केली.
 रविवारी धारापूरममध्ये राहुल गांधी म्हणाले की, “नागपूरचा ‘निक्करवाला’ (चड्डीवाला) तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाही.  तामिळनाडूचे भवितव्य येथील तरुण ठरवतील आणि मी त्यांना मदत करायला आलो आहे.  पुढे राहुल गांधी म्हणाले की, येथे असे सरकार असले पाहिजे जे तमिळ लोकांच्या हिताचे काम करेल.  आम्ही नरेंद्र मोदींना भारताचा पाया नष्ट करु देणार नाही.
यापूर्वी इरोड येथे संबोधित करताना राहुल गांधींनी लोकांना सांगितले की, “तुम्ही काय करावे हे सांगण्यासाठी मी येथे आलेलो नाही.  मी तुमच्याशी ‘मन की बात’ बोलायला देखील आलो नाही.  मी येथे तुम्हाला ऐकण्यासाठी आलो आहे.  मी तुमच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलो आहे.”
 राहुल गांधी यांनी शेतकरी चळवळीला पाठिंबा देताना म्हटले की, “ऐकून घेण्याऐवजी, शेतकर्‍यांच्या समस्या समजून घेण्याऐवजी सध्याचे सरकार त्यांना अतिरेकी म्हणत आहे.”  आम्ही या शेतकऱ्यां बरोबर एकत्र लढा देऊ. ”यापूर्वी त्यांनी ट्विट करून केंद्र सरकारला महागाईच्या आघाडीवर घेरलेले होते.
त्यांनी लिहिले होते की, मोदींनी “जीडीपी ‘, गॅस-डिझेल-पेट्रोलच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ केली आहे!  जनता महागाईमुळे त्रस्त आणि मोदी सरकार कर वसुलीमध्ये व्यस्त आहे.” तर राहुल यांनी ट्विटरवर एका वृत्तपत्राचा स्क्रीनशॉटही शेअर केला होता ज्यामध्ये तेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींविषयी सांगण्यात आले होते.
 यावर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका
राहुल गांधी २३ जानेवारी २०२१ रोजी तामिळनाडूला पोहोचले.  ते तीन दिवसांच्या तामिळनाडू दौर्‍यावर आहेत.  यावर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.  अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी पक्षासाठी प्रचार सुरू केला आहे.  शनिवारी त्यांनी एमएसएमई क्षेत्राशी संबंधित लोकांशी संवाद साधला.  यूपीए सरकार आल्यावर सध्याच्या जीएसटी नियमात बदल केले जातील असे त्यांनी सांगितले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा