नागराज मंजुळेचा “झुंड” वादाच्या भोवऱ्यात

मुंबई, दि.२७ मे २०२०: अभिनेता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत आहेत. मात्र हा चित्रपटात सुरू होण्यागोदरच याच्या विरूद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २८ मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. हा खटला हैदराबाद येथील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगणातील मियापूरमध्ये अतिरिक्‍त जिल्हा न्यायाधीश रंगा रेड्डी यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.

याचिकेत कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनजीओ ‘स्लम सॉकर फाउंडेशन’चे संस्थापक आणि कोच विजय बरसे यांच्यावर झुंड चित्रपट आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल खेळासाठी प्रोत्साहन दिले आणि वाईट गोष्टींचा नाद लागण्यापासून त्यांना रोखले. मात्र विजय हे अखिलेश पॉल याचेही कोच होते. जो गँगस्टर ते फुटबॉल खेडाळू असा त्याचा प्रवास आहे.

विजय बरसे यांचे जीवनचरित्र अखिलेश पॉलशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे कुमार यांचे म्हणणे आहे. चिन्नी कुमार यांचा दावा आहे की, त्यांनी अखिलेश पॉल यांचे सर्व कॉपीराइट विकत घेतले आहे. त्यांना हे अधिकार चित्रपटासाठी नव्हे तर केवळ वृत्तचित्रसाठी विकायचे आहेत.

मात्र, नागराज मंजुळे जो चित्रपट बनवत आहे तो कॉपीराइटचे उल्लंघन करतो आहे. आणि त्याला माझा विरोध आहे असे त्यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा