लखनऊ (उत्तरप्रदेश) : देशात सध्या सगळीकडे नागरिकत्व कायद्यावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. देशातील काही लोक या कायद्याचे समर्थन करत आहेत, तर काही लोक निषेध करताना दिसत आहेत. त्यातच केंद्र सरकराने केलेल्या या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरताना दिसत आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन शेजारी देशांतून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी व ख्रिश्चन व अन्य स्थलांतरितांना या कायद्यानुसार नागरिकत्व देता यावे, यासाठी त्यांचा शोध घेण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,अशी माहिती गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी दिली आहे. तर या तीन देशांमधून आलेले मुस्लिम स्थलांतरित किती आणि कुठे आहेत, याचीही माहिती घेऊन ती केंद्र सरकारला कळविली जाईल. त्यांना त्यांच्या देशात परत पाठवायचे किंवा नाही हे केंद्रच ठरवेल. असेही अवस्थी यांनी सांगितले आहे.