गोल पोस्ट इतर सरकारी योजना नागरिकत्व कायद्यात होणार बदल : अमित शहा

नागरिकत्व कायद्यात होणार बदल : अमित शहा

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा लोकसभा, राज्यसभेत पास झाल्यानंतर देशातील पूर्वोत्तर राज्यात हिंसक वळण लागले आहे. हिसंकवळण लागल्यानंतर केंद्रीयगृह मंत्री अमित शहा यांनी या कायद्यात बदल करण्याचे संकेत दिले आहे.

झारखंडमधील गिरिडीह येथे एका निवडणूक सभेत संबोधित करताना शहा यांनी हे संकेत दिले आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या कायद्यात बदल करावेत, असे आपल्याला सांगितल्याचे अमित शहा यांनी सभेत बोलताना सांगितले.

कुणालाही या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असे श हा यांनी सांगितले. यापूर्वी लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले.
शाह यांचे नागरिकत्व कायद्यावरील हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नागरिकत्व कायद्याची आमच्या राज्यात अंमलबजावणी करणार नाही, असे पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध काँग्रेस पक्षाने हिंसा पसवली असा थेट आरोप शहा यांनी या सभेत केला. आम्ही नागरिकत्व संशोधन विधेयक आणल्यामुळे काँग्रेस पोटात दुखत आहे.
या विरोधात काँग्रेस हिंसा पसरवण्याचे काम करत आहे, असेही शहा म्हणाले. या कायद्यामुळे ईशान्य भारतातील संस्कृती, भाषा, सामाजिक ओळख आणि राजकीय अधिकारांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, असेही शहा म्हणाले.

error: Content is protected !!
Exit mobile version