….नाही तर शेतकऱ्याच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरू : उदयनराजे भोसले

सातारा: अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे राज्यसरकारने या नुकसानभरपाईबाबत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, कोलमडलेल्या शेतकऱ्याला सरकारने धीर द्यावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्हीं रस्त्यावर उतरण्याचा इशारा भोसले यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. निवडणूक काळात असल्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग या भागात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दहा वर्षांपासून मागणी करत असलेली “इर्मा” योजनेची अमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडे हात पसरावे लागले नसते.
तरी सरकारने या नुकसान ग्रस्त भागाची ड्रोनद्वारे पहाणी करावी अशी मागणी उदयनराजे यांनी या निवेदनातून केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा