पुणे, २१ ऑक्टोबर २०२०: वानवडी प्रभागातील सर्वे नंबर 70 जगताप नगर आणि दिवा नगर येथील पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील झालेल्या गाळ व कचरा यांचा सफाईचे काम आज करण्यात आले.
वानवडी प्रभागातील सर्वे नंबर 77 जगताप नगर आणि दिव्या नगर येथे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नाल्याच्या कडेला कचरा व राडारोडा वाहून आला होता.
त्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाला होता आणि जगताप नगर परदेशी संख्या वस्तीमधील स्थानिक नागरिकांच्या घराजवळ धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.
नाल्याच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या कचरा व राडारोडामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. येथील काही स्थानिक नागरिकांनी नगरसेवक प्रशांत जगताप यांच्याकडे पावसाच्या पाण्यामुळे वाहून आलेल्या कचऱ्याचे व राडारोडा याची सफाई करावी जेणेकरून नाल्याच्या पाण्याचा प्रवाह नीट सुरू होईल अशी मागणी केली होती.
या तक्रारीची दखल घेत आज जेसीबीच्या साह्याने नाल्यांमध्ये जमा झालेला कचरा व राडारोडा बाजूला काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करून देण्यात आला. व यामुळे स्थानिक नागरिकांचा धोका टळला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे