महाराष्ट्रात काँग्रेस एकसंघ, नाना पटोलेंचा विश्वास

नवी दिल्ली, ११ जुलै २०२३ : राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शना खाली आज दिल्लीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, महासचिव के.सी.वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवड, सुशील कुमार शिंदे, आणि पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांसदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती, नाना पटोले यांनी बैठकीनंतर वृत्त माध्यमांशी बोलताना दिलीे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस एकसंघ आहे. महाराष्ट्रात काँग्रेस फुटणार नाही. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष हा काँग्रेस असेल. काँग्रेसची सध्या लाट आहे. आज लोकांनी ते मान्य केलंय, त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेलच. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमचं ४८ जागांवर काम सुरू आहे. जर आघाडी झाली तर आमच्या पक्षाची ताकद त्यांना मिळेल. महाराष्ट्र असं राज्य आहे, जिथे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. जे आमच्यासोबत येतील, त्यांना आमचा फायदाच होणार आहे.

राज्यात जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर पक्ष संघटन केल जाणार असुन भाजपा विरोधात पदयात्रा काढली जाईल. या पदयात्रेतून नरेंद्र मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्रातील तिघाडा सरकारमध्ये कसा ईडी आणि खोक्याचा वापर झाला आहे, तसेच ईडी मार्फत भीती घालून महाराष्ट्राची विचारधारा विकत घेण्याचं कसे मोदींनी केलं हे आम्ही जनतेत जाऊन सांगणार आहोत. भाजपाच सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत बेरोजगारी, महागाई देखील वाढली आहे. गरिबांच्या या समस्या लक्षात घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहोत असे नाना पटोले म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा