नॅन्सी पेलोसींनी घेतली राष्ट्राध्यक्ष वेन यांची भेट, म्हणाल्या – तैवानला प्रत्येक स्तरावर पाठिंबा देऊ

नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२२: यूएस संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी त्यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी तैवानच्या संसदेत आल्या. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. पेलोसी यांना संसदेत तैवानचा सर्वोच्च नागरी सन्मान स्पेशल ग्रँड कॉर्डनसह ऑर्डर ऑफ प्रोपियस क्लाउड्सने सन्मानित करण्यात आलं.

पेलोसी म्हणाल्या- सुरक्षेच्या मुद्द्यावर अमेरिका तैवानला पाठिंबा देईल. आम्ही प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत आहोत. तैवानच्या मैत्रीचा आम्हाला अभिमान आहे. तैवानच्या पाठीशी उभे राहण्याचं ४३ वर्षांपूर्वी अमेरिकेने दिलेलं वचन आजही ते पूर्ण करत असल्याचं त्या म्हणाल्या.

नॅन्सी पेलोसी यांनी तैवान संसदेच्या उपसभापती त्साई ची-चांग यांचीही भेट घेतली. यादरम्यान त्यांनी तियानमेन स्क्वेअर हत्याकांडाचा संदर्भ देत मानवी हक्कांसाठी अमेरिकन समर्थनाची हमी दिली.

चीनने लादले तैवानवर आर्थिक निर्बंध

इकडे पेलोसीच्या भेटीमुळं नाराज झालेल्या चीनने तैवानसाठी आर्थिक समस्या निर्माण करण्यास सुरुवात केलीय. चीन सरकारने तैवानला नैसर्गिक वाळू पुरवण्यावर बंदी घातलीय. यामुळं तैवानचे खूप नुकसान होऊ शकतं. कोरोना महामारीपासून, बांधकाम आणि पायाभूत सुविधांचा विकास तैवानसाठी उत्पन्नाचा स्रोत बनलाय. अशा स्थितीत वाळूची निर्यात बंद केल्याने तैवानचं आर्थिक नुकसान होणार आहे. १ जुलै रोजी चीनने तैवानमधून १०० हून अधिक अन्न पुरवठादारांच्या आयातीवरही बंदी घातली.

पेलोसींच्या भेटीवर चीन नाराज असल्यास काय करू शकतो?

• चीन आता तैवानवर अधिक दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. यासाठी चिनी लढाऊ विमाने तैवानच्या हवाई हद्दीत पूर्वीपेक्षा जास्त घुसखोरी करतील.

• चीन तैवानला चिथावणी देऊ शकतो. तैवानच्या हवाई क्षेत्रात लढाऊ विमाने पाठवून चीन तैवानला हल्ल्यासाठी चिथावणी देण्याचा प्रयत्न करंल.

• चीन सरकार अमेरिकेला
डिप्लोमॅटिक विरोध करू शकतो. तो अमेरिकेतून त्यांचा राजदूत किन गँगला परत बोलवू शकतो.

चीनविरुद्ध तैवान आणि अमेरिका सज्ज

वृत्तानुसार, अमेरिका आणि तैवानचे सैन्य चीनशी सामना करण्यासाठी तयार आहेत. अमेरिकेच्या नौदलाच्या चार युद्धनौका हाय अलर्टवर असून तैवानच्या सागरी सीमेवर गस्त घालत आहेत. त्यांच्याकडे F-16 आणि F-35 सारखी अत्यंत प्रगत लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्रं आहेत. रीपर ड्रोन आणि लेझर गाईडेड मिसाईल्सही तयार आहेत. चीन विरोधात अमेरिका आणि तैवान दोन्ही बाजूंनी हल्ला करू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा