नांदेड जिल्ह्यात महावितरणची मान्सूनपूर्व कामे वेगात

नांदेड, दि.२७ मे २०२०: महावितरणच्या वतीने येणाऱ्या मान्सूनची दखल घेत मान्सूनपूर्व तयारी सुरू केली आहे. कामांकडे दुर्लक्ष न करता सर्व कामे वेळेच्याआत पुर्ण करण्याचे निर्देश महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले.

पावसाळयामध्ये वीजग्राहकांना अखंडीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा सातत्याने मिळावा, याकरिता पावसाळयापूर्वी महावितरणच्यावतीने देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत.

यामध्ये रोहित्रांची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण आदी कामांचा समावेश आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा