नांदेड, दि.२३मे २०२०: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जूनसाठी अन्नधान्याचे दिलेल्या नियमित नियतनानंतर वाटप सुरू करण्यात आले आहे.
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रतिमाह १ किलो डाळ ई-पॅाश मशीनद्वारे देण्यात येणार आहे. शिधा पत्रिकाधारकांनी स्वस्तधान्य दुकानात गर्दी करु नये.
त्यामुळे सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करुन धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी केले आहे.
नांदेड जिल्हयातील १६ तालुक्यांना अंत्योदय अन्न योजनेतील ८० हजार १२४ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य कुटुंब येाजनेतील ४ लाख १० हजार २०१ शिधापत्रिकाधारकांना या येाजनेंतर्गत मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी प्रतिमाह ५२८ मे. टन डाळ मंजूर करण्यात आली आहे.
मोफत डाळ एपीएल शेतकरी व एपीएल केशरी लाभार्थ्यांना मिळणार नाही. याबाबत संबंधित तहसिलदार तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना नमूद जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना डाळ वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: