नांदेड येथे बालतपस्वी महाराजांची हत्या

9

नांदेड, दि.२४ मे २०२० : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठाणा येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रविवार ( दि.२४)च्या मध्यरात्री गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पालघरच्या घटनेनंतर हा प्रकार घडल्याने राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. त्याच बरोबर त्यांच्या एका अनुयायीचा ही मृतदेह बाथरूम मध्ये आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागठाणा बुद्रुक येथील एक तरूण रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या मठात शिरला व त्यांच्याकडे असलेला ऐवज लुटला. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. तसेच महाराजांच्या वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्नही केला. परंतू आजूबाजूला असलेले लोक जागे झाले. त्यामुळे मारेकऱ्याने तेथून पळ काढला.

बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचे पार्थिव शरीर उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच भाविकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी: