नंदुरबार, ११ ऑक्टोंबर २०२२: प्रशासन वेळेवर पगार देत नाही,आणि आमची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा ठपका ठेवत. जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर हजारो कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य सुविधा कोलमंडली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत ३४ प्राथमिक व उपकेंद्र अंतर्गत जवळपास ३५२ कर्मचारी आणि ७० वैधकीय अधिकारी कार्यरत आहेत. मागील आठवड्यात जिल्हा परिषद अधिकारी रघूनाथ गावडे व जिल्हा आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तयार केली होती.
या पथकांने रात्री कर्मचारी कार्यरत आहेत की नाही, यांची तपासणी केली असता. त्यामध्ये ६६ कर्मचारी आणि १३ वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आले होते. प्रशासनाने गैरहजर कर्मचाऱ्यांवर कायदेशीर नोटीस बजावून कारवाईचे संकेत दिल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकारी संघटनेच्यावतीने प्रशासन वेळेवर पगार देत नाही, आमची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा ठपका ठेवला.
एकूणच प्रशासनाने गैरहजरीबाबत कर्मचाऱ्यांना कारवाईचे उचललेले पाऊल व कर्मचाऱ्यांना वेळेत पगार तसेच पीआयबी नियमित मिळत नसल्याचा आरोप करत हा बेमुदत काम बंद आंदोलनामुळे सामान्य जनता मात्र भरडून निघत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर