गोल पोस्ट गुन्हा ५० पेक्षा जास्त तरूणी बरोबर शारिरीक संबंध ठेवणारा नराधम गजाआड……

५० पेक्षा जास्त तरूणी बरोबर शारिरीक संबंध ठेवणारा नराधम गजाआड……

अहमदाबाद, २० जानेवारी २०२१: हल्लीच्या काळात ऑनलाईन फ्राॅड वाढले आसून आनेक धक्कादायक प्रकार यामधून समोर आले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अहमदाबाद  मधून समोर आली आहे. जिथे गुगलचा कर्मचारी असल्याचे भासवून ५० पेक्षाही जास्त तरूणींचे एका नरधमांने लैंगिक शोषण केले आहे.

संदीप मिश्रा उर्फ विहान शर्मा असे नरधमाचे नाव आसून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ५० पेक्षाही जास्त मुलींचे त्याने शोषण केल्याप्रकरणी आटक करण्यात आली असून तो मॅट्रिमोनिअल साईटवरखोटे प्रोफाईल तयार करायचा. त्याबरोबरच आपला पगार ४० लाख आसल्याचं सांगायचा. तसेच सुरवातीला तो तरूणी सोबत शारिरीक संबंध ठेवायचा आणि नंतर त्यांचाकडूनच पैसे घेऊन पळून जायचा.

यासंबधी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, संदीप मिश्रा हा मॅट्रिमोनिअल साईटवर विहान शर्मा, प्रतिक शर्मा व आकाश शर्मा अशा विविध नावांचा वापर करून वेगवेगळी प्रोफाईल तयार करायचा. प्राथमिक तपासात हे उघड झाले की, त्याने मॅट्रिमोनिअल साईटवर खोटे प्रोफाईल तयार करून स्वतःचा पगार चक्क ४० लाख असल्याचं सांगितलं आहे.

सुरूवातीस तो तरुणींसोबत शारीरिक संबंध निर्माण करायचा आणि त्यानंतर त्यांच्याकडील पैसे उकळून त्यांना सोडून द्यायचा. एवढच नाहीतर त्याने तरुणींसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ देखील शूट केले आहेत. यातील काही व्हिडिओ त्याच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमध्ये आढळून आले आहेत. इंडिया टुडेने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

त्यामुळे तुम्ही देखील जर सोशल मिडिया हातळत असला तरी एक प्रकारची संपूर्ण माहिती घेणे गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीत इंटरनेट आणि सोशल मिडियामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्यात खरे पण गुन्हेगारी याच क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version