गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक कुर्डुवाडीत सांब शिवयोगेश्वर महाराजांची पुण्यतिथी साजरी..

कुर्डुवाडीत सांब शिवयोगेश्वर महाराजांची पुण्यतिथी साजरी..

माढा, २० जानेवारी २०२१: श्री ष. ब्र.१०८ गुरुमुर्ती तपोनिधी श्री सांब शिवयोगेश्वर महाराज यांची ८० वी पुण्यतिथी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुर्डुवाडी शहरात साधेपणाने साजरी करण्यात आली. मंदिरात पहाटे पाच वाजता वीरशैव समाजाच्या वतीने श्रींच्या जागृत समाधीस रुद्राभिषेक करण्यात आला.

सर्वप्रथम भक्तांचे रुद्राभिषेक, आशि र्वचन व श्रींच्या पालखीची व प्रतिमेची मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. महाआरती नंतर कर्नाटक राज्यातून आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. यावेळी पौरोहित्य सोमनाथ स्वामी यांनी केले.
यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष मिलिंद डिकोळे, उपाध्यक्ष जयदीप ढेपे, सचिव महेश वाळुजकर, खजिनदार कैलास डिकोळे, सहखजिनदार चंदुलाल म्हमाणे, धन्यकुमार ठोकडे चंद्रशेखर शेंडे, गणेश शेटे, बसव प्रतिष्ठानचे सागर कोले उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version