(जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, २००१ पासून मे २२, २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.
वैयक्तिक माहिती
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी, आजोबांचे मूळचंद मगनलाल मोदी, तर पणजोबांचे मगनलाल रणछोडदास मोदी. नरेंद्र मोदींच्या आईचे नाव हिराबेन आहे. दामोदर दास व हिराबेन या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात आमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते पुरेसे योगदान देऊन सार्थ करत आहेत.
पूर्व जीवन
मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली.
भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकला.
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावली.
शंकरसिंह वाघेला व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती.
राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले.
फक्त २००२ मधील गुजरात मधल्यात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्वीकार्यतेस ‘खो’ घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांच्या चेहर्यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकला नाही. आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले.
गुजरातचे मुख्यमंत्री
नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांच्या चौथ्यांदा झालेल्या शपथविधीला अनेक राज्यांचे मुख्यंमंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगलीमधे नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता असा अरोप संजीव भट ह्या पोलिस अधिकाऱ्यानी १८ पानी आरोप पत्र दाखल करून केला होता.
आज १७ सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस त्यानिमित्त न्यूज अनकट तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
न्यूज अनकट