नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे साकोरा येथे भव्य रक्तदान शिबिर

नांदगाव, २२ फेब्रुवारी २०२४ : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या वतीने ‘तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा’ या शिकवणीनुसार  नुकतेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकुण १६२ महीला आणि पुरूष भाविकांनी रक्तदान केले.

गेल्या कित्येक वर्षांपासून दरवर्षी या संस्थानच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. मात्र गत दोन वर्षांत कोरोनामुळे खंड पडल्यामुळे रक्तदान शिबीर थंडावले होते. गरजू रूग्णांना उपचारासाठी तातडीने  रक्ताची गरज भासल्यास या संस्थानच्या वतीने रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे संस्थांनतर्फे वर्षभर नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावर्षी  दिनांक १० ते २५ फेब्रुवारी या पंधरवड्यात देशातील १७ राज्यात  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काल मंगळवारी छ. शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सरकारमान्य स्व.डाॅ.जी.एम. भावसार चॅरिटेबल ट्रस्ट मालेगांव ब्लड सेंटरच्या वतीने नांदगाव तालुक्यातील मनमाड व ढेकू गावात शिबिर घेण्यात आले असून मनमाडला २६० तर ढेकू येथे १२७ भाविकांनी रक्तदान केले. तर साकोरा येथे आज १६२ महीला आणि पुरूष भाविकांनी रक्तदान केले. भाविकांसह नागरिकांनी देखील वरील पंधरवड्यात रक्तदान शिबिरात सहभागी होऊन राष्ट्रकार्यात हातभार लावावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा