आज होणार मंगळ ग्रहावर नासाच्या पर्सीव्हरेन्स मार्स रोव्हरची लँडिंग

यूएस, १८ फेब्रुवरी २०२१: अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे अंतराळ यान मंगळाच्या धर्तीवर आज म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा लँड होणार आहे. मात्र मंगळाच्या धरतीवर लँड करण्यापूर्वी अमेरिकन अंतराळ यान ‘नासा पर्सीव्हरेन्स रोव्हर’ ला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यातील अनेक अडचणी अशा असतील ज्यांचे पर्सीव्हरेन्स रोव्हर ला स्वतः निराकरण करावे लागेल. परंतु मंगळ ग्रहावर याआधीच आणखी एक रोवर उपस्थित आहे जो त्याच्या उर्वरित अडचणी दूर करण्यास पर्सीव्हरेन्स रोव्हर ला मदत करेल. चला तर जाणून घेऊया की पर्सीव्हरेन्स रोव्हर ला कोणकोणत्या अडचणी येणार आहे व मंगळ ग्रहावर आधीपासूनच उपस्थित असलेला दुसरा रोव्हर या अडचणी दूर करण्यामध्ये पर्सीव्हरेन्स रोव्हरला कशी मदत करेल.
मंगळ ग्रहावर लँड करण्यापूर्वी पर्सीव्हरेन्स मार्स रोव्हर ची गती ८० हजार किलोमीटर प्रति तास एवढी असेल. या तीस मिनिटं दरम्यान या पर्सीव्हरेन्स रोव्हरची गती हळूहळू कमी करत इतकी कमी करावी लागेल की मंगळाच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर पर्सीव्हरेन्स रोव्हर ला कोणतेही नुकसान पोचणार नाही. यातील सर्वात पहिली अडचण ही असेल तर दुसरा सर्वात मोठा अडथळा म्हणजे उष्णता.
मंगळ ग्रहाच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर पर्सीव्हरेन्स मार्स रोव्हरला वातावरणीय घर्षणामुळे १००० डिग्री सेल्सिअस पर्यंत चे तापमान सोसावे लागेल. यानंतर पर्सीव्हरेन्स मार्स रोव्हर मंगळावरील एका खड्ड्यामध्ये करेल. या जागेला जेजेरा क्रिएटर असे नाव देण्यात आले आहे.
जेजेरा क्रिएटर क्रेटरमध्ये खोल दऱ्या, तीक्ष्ण पर्वत, खडक, वाळूचे ढीग आणि दगडांचा साठा आहे.  अशा परिस्थितीत पर्सिव्हरेन्स मार्स रोव्हरचे लँडिंग किती यशस्वी होईल याकडे जगातील शास्त्रज्ञांचे लक्ष लागून आहे.
आता मंगळ ग्रहावर आधीपासूनच असलेल्या रोव्हर विषयी जाणून घेऊया.  हा रोव्हर पर्सीव्हरेन्स मार्स रोव्हर ला लँडिंग करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मदत करणार आहे. या रोव्हरचे नाव मार्स इनसाईट असे आहे. हा नासाचाच एक रोव्हर असून नोव्हेंबर २०१८ मध्ये नासाने याला मंगळावर प्रस्थापित केले होते.
मार्स इनसाईट रोव्हर चे काम आहे मंगळावरील पृष्ठ भागाचे परीक्षण करणे. तसेच पृष्ठ भागावर आणि पृष्ठ भगाखली येणाऱ्या भूकंपाची माहिती गोळा करणे.  नोव्हेंबर २०१८ पासून हा रोव्हर मंगळावरील होत असलेल्या भूकंपाची माहिती नासाला पुरवीत आहे. जेव्हा पर्सीव्हरेन्स मार्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरेल तेव्हा इनसाईट नासा आणि रोव्हरपर्सीव्हरेन्स मार्स रोव्हर दोघांनाही सांगेल की त्याच्या लँडिंग साइटवर भूकंप होणार आहे की नाही.
ज्याप्रकारे पृथ्वीवरील भूकंपाला अर्थक्वेक म्हणतात, त्याचप्रमाणे मंगळावरील भूकंपला मार्सक्वेक असे म्हणतात.  सन २०१९ मध्ये, मार्स इनसाइटच्या टीम ने प्रथमच जगाला सांगितले की मंगळावरही भूकंप होतात.  हे भूकंप पृथ्वीच्या भूकंपापेक्षा काहीसे वेगळे असले तरी ते कोणत्या प्रकारचे भूकंप आहेत हे अद्याप एक रहस्यच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा