नाशिक : चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले ३८ प्रवाशांचे प्राण

नाशिक, १ जानेवारी २०२३: दोंडाईचा येथून पुण्याला जाणाऱ्या धावत्या एसटी बसच्या इंजीनमध्ये आग लागल्याची घटना मनमाडच्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर घडली. बसचालकाने समयसूचकता दाखवून तातडीने बस थांबावत प्रवाशांना बसमधून खाली उतरवल्याने ३८ प्रवाशांचा जीव वाचला आहे. इंजीनमध्ये आग लागल्यानंतर डिझेल पाइप फाटून त्यातून डिझेल गळती सुरु झाली होती, मात्र चालकाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टाळला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोंडाईच्या आगाराची बस एमएच-१४ बीटी २७१२ ही बस मनमाडला आल्यानंतर त्यातून काही प्रवासी उतरले. उरलेल्या ३८ प्रवाशांना घेऊन ही बस पुण्याकडे घेऊन जात होती. यावेळी रेल्वेच्या ब्रिजवरुन जात असताना तिच्या इंजीनमधून धूर निघून अचानक आग लागली. चालक किशोर वाघने तातडीने बस थांबावून सर्व प्रवाशांना खाली उतरवले.

वाघ आणि वाहक व्ही.सी पाटील यांनी बसमधील फायर बॉटलने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविले. चालकाने दाखविलेल्या समयसुचकतेमुळे सर्व ३८ प्रवाशांचा जीव वाचलाच, शिवाय बस देखील जळून खाक होण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच मनमाड एसटी डेपोचे आगारप्रमूख लाड वंजारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना दिलासा दिला.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा