नाशिक, दि.२३ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ महिन्यापासून बंद असलेली नाशिक-अहमदाबाद विमानसेवा सोमवार पासून सुरू असल्याने नाशिककरंनाही याचा लाभ होणार आहे.
ओझर विमानतलावरून ट्रूजेट या कंपनीने हि सेवा देण्यास संमती दर्शवली आहे. केंद्र सरकारच्या उडाण योजनेच्या अंतर्गत नाशिक अहमदाबाद या विमानसेवेला सुरुवात होणार असल्याने हळूहळू अर्थकारण पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
सिव्हील एव्हीएशन विभागाला नाशिक हैदराबाद या सेवेसाठी विमानसेवा अलायन्स एअरकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र त्यांच्या कडून कोणताही निर्णय न झाल्याने नाशिक हैदराबाद सेवा सध्या तरी सुरू होणार नाही.
सोमवारपासून नाशिक अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होणार असली तरी हैद्राबाद जाण्यासाठी प्रवाशांना शिर्डी हैद्राबाद हा पर्याय उपलब्ध झाला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: