नाशिकमध्ये दिवसा कडक ऊन अन् रात्री गारवा; बदलत्या हवामानामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त

5

नाशिक, १० जानेवारी २०२३ : नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम नाशिकच्या हवामानावर होत असून, सातत्याने बदल होत आहे.

नाशिकमध्ये गुरुवारी किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असले, तरी कमाल तापमानाचा पारा ३४.७ अंशांवर जाऊन पोचला आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाका बसत आहे. सर्वसामान्य नागरिक पाच मिनिटेदेखील उन्हात उभे राहू शकत नाहीत. तर रात्री शीतवाऱ्यांंचा वेग अधिक असल्याने थंडी जाणवते आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना ताप, सर्दी-पडसे अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्याच्या अन्य भागांतही ऊन-थंडीचा खेळ सुरू असल्याने तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान, वातावरणातील हा बदल पुढील काही दिवस कायम राहील, असा अदांज वर्तविला जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा