नाशिकने टाकले पॉझिटिव्ह अहवालात मालेगावला मागे

नाशिक,, दि.२४ मे २०२० : मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होवून आता नाशिक शहरात बाधितांची संख्या वाढू लागल्याचे गेल्या चार दिवसांतील आकडेवारीवरुन समोर आले आहे. मागील चार दिवसांत मालेगावात २०, तर नाशिक शहरात २७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनास शनिवारी दिवसभरात तीन टप्प्यात प्राप्त अहवालामध्ये नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

नाशिक शहरातील- ८, मालेगाव ४, मौजे सुकेणे येथील २६ वर्षीय युवती, उगावमधील- २, पांगरी (ता.सिन्नर)- २, येवला-१, पाथरे शेंबे (ता. चांदवड)- १, मनमाड- २ आणि कणकोरी (ता.सिन्नर) येथील १२ वर्षीय मुलाचा यात समावेश आहे. पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये शहरातील आगर टाकळी येथील आरोग्य सेवकही आहे. त्याचा यापूर्वीच मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या ४८ वर पोहोचली आहे.

नाशिक शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे मुंबई किंवा मालेगाव कनेक्शन समोर येत आहे. शनिवारी दुपारी शहरातील कॉलेज रोड भागात असलेल्या विसेमळा येथील ५१ वर्षीय पोलीस आणि राणाप्रताप चौक, सिडकोतील ३४ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

बाधित पोलीस कर्मचारी हा मालेगावात बंदोबस्तासाठी गेलेला होता. त्याचे सलग दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
जिल्हा प्रशासनास शनिवारी सायंकाळी ७६ अहवाल प्राप्त झाले. यात १० रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये मौजे सुकेणे येथील २६ वर्षीय युवतीसह उगाव-२, पांगरी (ता. सिन्नर) २, येवला १, पाथरे शेंबे (ता. चांदवड) १, मनमाड २ आणि कणकोरी (ता. सिन्नर) येथील १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

शनिवारी सायंकाळी पुन्हा शहरातील सहा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. यात नाईकवाडी ४, भारतनगर, शिवाजीवाडी १, आगर टाकळी येथील एकाचा समावेश आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा