राष्ट्रीय शिक्षण दिन २०२२

पुणे, ११ नोव्हेंबर २०२२: भारतातील पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. अबुल कलाम आझाद हे एक विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी स्वातंत्रवीर म्हणुन भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठे योगदान दिले.

मौलाना आझाद हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि प्लॅनिंगच्या स्थापनेमागचे विचारवंत होते. १९५० नंतर ते माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला लागले.

त्यांना असं वाटायचं की समाजात असणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचल्याशिवाय राष्ट्रीय शिक्षणाचा कोणताही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. स्त्री शिक्षणाचे विशेष पुरस्कर्ते म्हणुन मौलाना आझाद हे ओळखले जातात. भारतात १९५६ मधे त्यांच्या पुढाकाराने “विद्यापीठ अनुदान आयोग’ ची स्थापना करण्यात आली. मौलाना हे एक दूरदर्शी विद्वान होते. सर्व मुलांना त्यांचा धर्म, जात, लिंग ना बघता वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधि : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा