राष्ट्रीय कन्या दिन

आज देशभारत ‘राष्ट्रीय कन्या दिवस (National Daughter’s Day) साजरा केला जात आहे. याशिवाय जगभरात 11 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक कन्या दिन’ साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावं, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी, शिक्षणाचा हक्क मिळावा, मुलगा- मुलगी यातील भेदभाव कमी व्हावा, या उद्देशाने ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ (National Daughter’s Day) देशभर साजरा करण्यात येतो.

भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे अनेकवेळा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी लेखन्यात येतं. मात्र, असं असलं तरी, स्त्रियांनी सर्व क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. त्यामुळे मुलगा-मुलगी हा भेद सध्या कमी झाला आहे. परंतु, असं असलं तरी अद्याप काही राज्यात स्त्रीभृण हत्येंच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे स्त्री-भृण हत्येला थारा देणाऱ्या नागरिकांमध्ये मुलगा आणि मुलगी यामधील भेदभाव मिटवण्यासाठी राष्ट्रीय कन्या दिवस एक महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे.

याशिवाय सरकारकडून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतात. यासाठी सरकारने अनेक योजनादेखील राबवल्या आहेत. या सर्व योजना पुरुष आणि स्त्रियांमधील भेदभाव मिटवण्यास उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे मुलीकडे ओझं म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदत आहे. आज राष्ट्रीय कन्या दिवसाचं औचित्य साधून आपल्या गोंडस मुलीला  शुभेच्छा नक्की द्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा