औरंगाबाद: येथे नॅशनल क्राइम ब्युरोच्या सुचनेनंतर बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पसरविणाऱ्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
या प्रकरणात पहिला गुन्हा औरंगाबाद मधील सिडको परिसरात दाखल करण्यात आला आहे. याशिवाय छावणी आणि सातारा पोलीस ठाण्यातही या गुन्ह्यांची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत केंद्राला नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या बेपत्ता आणि शोषित मुलांच्या राष्ट्रीय केंद्राकडून काही व्हिडीओ मिळाले आहेत. हे सर्व व्हिडीओ एक अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर पसरविल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात दिल्लीच्या नॅशनल क्राइम ब्युरोने या संदर्भात महाराष्ट्रातील सायबर क्राईमचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी संपर्क केला आहे. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे.