जालन्यात राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण पथकाची १७ पानटपऱ्यांवर कारवाई

जालना ८ फेब्रुवारी २०२४ : तंबाखु नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपरीधारकांवर कोटपा- 2003 कायद्याअंतर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे छापे टाकण्यात आले. यामध्ये कायद्याअंतर्गत विविध कलमानुसार एकुण १७ पानटपऱ्यांवर कारवाई करून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, शहरातील विविध ठिकाणी अवैधरित्या गुटखा, तंबाखु, मावा, जर्दा, खर्रा आणि सुट्टे सिगारेट इत्यादींची विक्री करणाऱ्या तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपरीधारकांवर कोटपा 2003 कायद्याअंतर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे छापे टाकण्यात आले.

ही कारवाई संपुर्ण जिल्हाभरात यापुढेही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे, तरी पानटपरी धारकांनी अवैध्यरित्या कुठल्याही तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करु नये. ही कारवाही स्थानिक गुन्हे शाखेचे एस.पी.तनपुरे व आकृर धांडगे, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, समुपदेशक सोनाजी भुतेकर, मंगेश गायकवाड यांच्याद्वारे करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा