नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचा लोगो आणि मॅस्कॉटचे अनावरण संपन्न

4

नाशिक ६ जानेवारी २०२४ : १२ जानेवारी २०२४ रोजी नाशिक येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा लोगो व मॅस्कॉटचे अनावरण क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास व पंचायत राज आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे, आमदार राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले तसेच प्रमुख लोकप्रतिनिधी आणि युवा खेळाडू उपस्थितीत होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा