राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कोविड शिक्षण शुल्कनीती अभियानाबाबत आक्रमक – वकिली अमरसिंह मारकड

4

इंदापूर, दि.२१ ऑगस्ट २०२०: कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात आर्थिक संकट ओढवले गेले आहे यामुळे पालकवर्ग कमालीच्या अर्थिक ताणातून जात आहे, अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये,क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क मागणी याबाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे. अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी मांडली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे विभाग प्रमुख सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान ही मोहीम राबविण्यात आली आहे.

यामध्ये, शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये.

शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे.

निश्चित केलेले शुल्क टप्प्या टप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी.

कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये.

वरील शुल्कनीतीची अंमलबजावणी करावी व त्याचबरोबर या शिक्षण शुल्कनीतीचा अवलंब करण्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर तसेच नारायणदास रामदास विद्यालय व ज्युनिअर काॅलेज ला निवेदन दिले विद्यार्थ्यांना वा पालकांना आपल्या संस्थेकडून नाहक त्रास झाल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या विरोधात आक्रमक भूमिका घेईल असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस व नगर जिल्हा पक्षनिरीक्षक अॅड अमरसिंह मारकड यांनी दिला यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थीचे सचिन काका खामगळ, सचिन चव्हाण, आण्णा सलगर, रितेश मारकड उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा