नवाज शरीफ चे डॉक्टर बरोबर संबंध

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात कैद असलेले शरीफ यांच्या रक्तातील पेशी अचानक कमी झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो च्या ताब्यातून त्यांना थेट रुग्णालयात हलवण्यात आले. ते २४ नोव्हेंबर २०१८ पासून तुरुंगात आहेत.

नवाज शरीफ यांचे खासगी डॉक्टर डॉ. अदनान खान यांनी ट्विट केले, की “माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्लेटलेट काउंट कमी झाल्याने त्यांना गंभीर आजारी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच त्यांना इतरही गंभीर आजार आहेत. त्यामुळे, रुग्णालयात तातडीने उपचार न झाल्यास त्यांना जीवाचा धोका आहे. त्यामुळे, वेळीच प्रशासनाला रुग्णालयात पाठवण्याची शिफारस करण्यात आली होती.” काही दिवसांपूर्वीच अदनान यांनी तुरुंगात असलेल्या शरीफांची भेट घेतली होती. त्यावेळी सुद्धा ते आजारीच होते.

नवाज शरीफांना काहीही झाल्यास पंतप्रधान जबाबदार राहतील नवाज शरीफ यांची प्रकृती नाजूक झाल्याचे पाहता त्यांचे बंधू आणि पाकिस्तान मुस्लिम लीग चे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी पंतप्रधानांवर रोष व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून नवाज शरीफांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी वारंवार सल्ले देऊनही त्यांना रुग्णालयात पाठवण्याची परवानगी मिळाली नाही. अशात नवाज शरीफांसोबत काहीही अनुचित घडल्यास त्यास पंतप्रधान इम्रान खान जबाबदार राहतील असे शहबाज शरीफ म्हणाले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा